Gondia Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Crime News : धक्कादायक! पत्नी, मुलगा आणि सासऱ्याला जिवंत जाळलं; जावयानं का गाठला क्रूरतेचा कळस?

सासाऱ्याचा जळून मृत्यू झाला आहे,तर पत्नी व मुलगा 90 टक्के भाजले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत घोरमारे

Gondia Crime News : गोंदिया येथून काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून जावयाने पत्नीसह मुलाला आणि सासऱ्याला पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये सासऱ्याचा जळून मृत्यू झाला आहे, तर पत्नी व मुलगा 90 टक्के भाजले आहेत. (Latest Gondia Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, घटना गोंदिया जिल्ह्याच्या सुर्याटोला येथे रात्रीच्या सुमारास घडली. गोंदिया शहरातील सुर्याटोला येथील देवानंद मेश्राम (वय 52 वर्ष) त्यांची मुलगी आरती किशोर शेंडे (वय 35 वर्ष), नातू जय किशोर शेंडे (वय 4वर्ष) हे तिघे रात्री झोपले असता आरोपी जावाई किशोर शेंडे (वय 41 वर्ष रा. भिवापूर तिरोडा)याने तिघांची निर्घृण हत्या केली आहे.

किशोर शेंडे रात्री गोंदिया येथे त्याच्या सासरी आला होता. तो घरी आला आहे हे त्यावेळी कुणाला समजले नाही, कारण रात्री सर्वजण झोपेत होते. यावेळी पत्नीचा राग डोक्यात असल्याने त्याने पत्नी, मुलगा आणि सासऱ्याला जीवंत जाळले. पेट्रोल टाकून जाळल्याची घटना रात्री 12 ते 1 च्या सुमारास घडली आहे.

यात देवानंद मेश्राम यांचा जळून मृत्यू झाला. तर आरती व जय हे 90 टक्के जळाले असून त्यांना नागपुर येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. आरोपी जावई फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT