Nagpur Crime Branch rescues Uzbek girl from Racket Saam tv news
महाराष्ट्र

Nagpur Crime: नागपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Human Trafficking Ring Exposed in Nagpur’s Hotels: नागपूर पोलिसांनी दोन हॉटेलवर धाड टाकत परदेशी तरुणीची सुटका केली असून, दोघा आरोपींना अटक केली. देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई करण्यात आली.

Bhagyashree Kamble

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुरात आतंरराष्ट्रीय देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केला आहे. या कारवाईत उझबेकिस्तानमधून आणलेल्या महिलेची सुटका करण्यात आली आहे. तसेच देहव्यापार चालवणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

नागपूर शहरातील सीए रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये आतंरराष्ट्रीय देहविक्रीचा व्यापार सुरू होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिल्लीतील दलालांमार्फत परदेशी तरूणींना भारतात आणण्यात येत होते. तसेच देशातील प्रमुख शहरातील हॉटेल्समध्ये देह व्यापारासाठी पाठवण्यात जात होते. नागपूरमधील एका नामांकित हॉटेलमध्येही असाच प्रकार सुरू होता. पोलिसांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी रॅकेटवर कारवाई केली.

दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई

पहिली कारवाई

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिडगावातील हॉटेल सरगम येथे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच दोन महिलांची सुटका केली आहे.

दुसरी कारवाई

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल पॅराडाईज येथे पोलिसांनी दुसरी कारवाई केली. येथे पोलिसांनी उझबेकिस्तान येथील विदेशी तरूणीची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दोन्ही घटनेची नोंद केली असून, दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी PITA कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवून महिलांकडून देह व्यापार

या रॅकेटमध्ये महिलांना अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देह व्यापार करवून घेतल्याचे पोलीस तपासातून समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, ही बेकायदेशीर कृती अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून मोठी कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

अगं बाई! विदेशातही पोहोचला महाराष्ट्राचा ठसका! इटालियन महिलांनी गायले मराठी गाणं 'आता वाजले की बारा'

SCROLL FOR NEXT