HSC RESULT 2023 Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra HSC Exams Result 2023 : पेढे वाटा! बारावीचा निकाल जाहीर, पाहा एका क्लिकवर

Maharashtra HSC Result 2023 Live : यंदा राज्यात १४.५७ लाख विद्यार्थ्यांनी HSC बोर्डाची परीक्षा दिली आहे.

Ruchika Jadhav

HSC RESULT 2023: बहुप्रतिक्षीत असलेला इयत्ता बारावीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजतापासून निकाल संकेतस्‍थळावर बघायला मिळणार आहे. राज्‍यात पुणे विभागाचा सर्वाधिक ९३.३४ टक्‍के निकाल लागला आहे. तर नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्‍के इतका आहे. नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ००२ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्‍यांहून अधिक गुण मिळविले आहेत. (12th HSC Result 2023 Date)

इयत्ता बारावीचा राज्‍याचा निकाल ९१.२५ टक्‍के लागला आहे. शिक्षण विभागातर्फे राज्‍यातील सर्व नऊ विभागांचा विभागनिहाय निकाल जाहीर केलेला आहे. राज्‍यस्‍तरावर विज्ञान शाखेचा निकाल ९६.०९ टक्‍के इतका लागला आहे. तर वाणिज्‍य शाखेचा निकाल ९०.४२ टक्‍के, कला शाखेचा निकाल ८४.०५ टक्‍के इतका लागला आहे.

राज्‍यस्‍तरावर १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या ६ लाख ८४ हजार ११८ इतकी असून, उत्तीर्णाची टक्‍केवारी ८९.१४ टक्‍के आहे. तर ६ लाख ८ हजार ३५० मुली उत्तीर्ण झालेल्‍या असून, मुलींच्‍या उत्तीर्णाची टक्‍केवारी ९३.७३ टक्‍के इतकी आहे.

विभागनिहाय निकाल असा-

पुणे-----------९३.३४

नागपूर-------९०.३५

औरंगाबाद---९१.८५

मुंबई---------८८.१३

कोल्‍हापूर----९३.२८

अमरावती----९२.७५

नाशिक--------९१.६६

लातूर---------९०.३७

कोकण---------९६.०१

इथे पहा निकाल...

mahresult.nic.in

https://hsc.mahresults.org.in

http://hscresult.mkcl.org

https://hindi.news18.com/news/career/ board-results-maharashtra-board

https://www.indiatoday.in/education-today/ maharashtra-board-class- 12th result 2023

http://mh12.abpmajha.com

परिक्षेसाठी कॉपी मुक्त अभियान

शालेय शिक्षण विभाचे प्रधान सचिव तसेच विविध सर्व मान्यवरांच्या उपस्थित यंदाची परीक्षा कॉपीमुक्त झाली. यावेळी २७१ भरारी पथके काम करत होते. त्यामुळे बारावीची परीक्षा जास्तीत जास्ता कॉपी मुक्त होऊ शकली, असं शरद गोसावी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT