- संजय राठोड
HSC Exam 2023 : परभणी (parbhani) जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेतील (HSC Exam 2023) इंग्रजी विषयाचा पेपर फुटीची (HSC English Subject Paper Leaked) प्रकरण समाेर असतानाच यवतमाळ (yavatmal latest news) जिल्ह्यात देखील समाज माध्यमातून पेपर फाेडल्या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण (education) क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
यवतमाळच्या मुकूटबन येथील मातोश्री पुणकाबाई कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्रातून बारावीची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका अवघ्या पंढरा मिनिटातच समाज माध्यमातून व्हायरल झाला. याप्रकरणी झरी जामणी पंचायत समितीतील गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी केंद्रप्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या कारवाईने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. यासाठी नियोजनही करण्यात आले. तरीही देखील मुकुटबन येथील बारावीचा इंग्रजीचा पेपर पुटला. (Maharashtra News)
आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडगाव डकरे येथील स्व.मोहन चव्हाण विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यालयात परिक्षा केंद्रातील खोली क्रमांक सहामध्ये काॅपी आढळून आल्याची तक्रार नायब तहसीलदार यांनी दिली आहे. त्यावरून पर्यवेक्षक आणि केंद्रासंचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.