HSC 12th Board Exam Online Hall Ticket Download Saam Tv
महाराष्ट्र

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

HSC 12th Board Exam Online Hall Ticket Download : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२६ परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे. हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे, परीक्षा तारखा व महत्त्वाच्या सूचना येथे वाचा.

Alisha Khedekar

  • बारावी परीक्षा २०२६ साठी हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध

  • लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान

  • प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी

  • हॉल तिकीटावर अधिकृत सही व शिक्का असणे बंधनकारक

Maharashtra Board Class 12 Exam Hall Ticket Download Process : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. फेब्रुवारी- मार्च २०२६मध्ये होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांपुर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आज पासून म्हणजेच १२ जानेवारी २०२६ पासून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत सुरु असणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन हॉल तिकीट कसे डाऊनलोड कराव यासाठी संपूर्ण बातमी वाचा.

मंडळाच्या माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार असून ती १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही हॉल तिकीटे डाउनलोड करून त्यांचे प्रिंटआउट विद्यार्थ्यांना द्यावे, असे निर्देश राज्य मंडळाकडून देण्यात आले आहेत.

बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही व शिक्का असणे अनिवार्य असणार आहे. फोटो असलेल्या प्रवेशपत्रावर अधिकृत स्वाक्षरी आणि शिक्का असणे गरजेचे आहे, अन्यथा ते वैध मानले जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर जाताना हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. हॉल तिकीट नसल्यास परीक्षेला बसता येणार नाही.

लेखी परीक्षेसोबतच प्रात्यक्षिक,तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएससीक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित केल्या जाणार आहेत.

हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?

  • महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in सुरु करा.

  • वेबसाईट सुरु होताच नंतर होमपेजवर “HSC Hall Ticket 2026” वर क्लिक करा

  • दिलेली माहिती भरून लॉगिन करा.

  • स्क्रीनवर तुमचे हॉल तिकीट दिसेल; त्याची काळजीपूर्वक तपासणी करा.

  • हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Toner : तुम्हाला त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे? मग हे ५ स्वस्तात मस्त टोनर घरीच बनवा

Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Bigg Boss Winner : बिग बॉसच्या विजेत्यानं दिली प्रेमाची कबुली, 'सौंदर्या'सोबतचा रोमँटिक PHOTOS शेअर

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Elections : राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरावर दगडफेक, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

SCROLL FOR NEXT