Pandharpur News
Pandharpur News भारत नागणे
महाराष्ट्र

पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेले घर गाव गुंडांनी पडले...

भारत नागणे

पंढरपूर - शेत जमिनीतून हुसकावून लावण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथील एका शेतमजुराचे राहते घर काही गाव गुंडाने पाडले आहे. यामुळे संजय क्षीरसागर या शेतमजूराचे कुटुंब उघड्यावर आले आहे. याबाबत पंढरपूर (Pandharpur) तालुका पोलीस (police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली‌ नाही उलट त्यांनाच दमबाजी केल्याचे समोर आले आहे. (Pandhrpur Latest News)

हे देखील पहा -

संजय शिरसागर या शेतमजुराने आपली एक एकर शेत जमीन आपल्या अज्ञान मुलाच्या नावे केली होती. आता मुलगा सज्ञान झाल्यानंतर त्यांने ती वडिलांच्या परस्पर विक्री केली. त्या शेत जमिनीतून हुसकावून लावण्यासाठी काही गाव गुंडांनी‌ पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेले घर व सौचालय पाडून टाकण्यात आले.

घर पाडत असताना व्हीडिओ व्हायरल झाला आहे. बेघर झालेल्या संजय क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबाने रात्र अक्षरशा पंढरपुरातील रस्त्यावर काढली. पोलिसांनी‌ घर पाडणाऱ्या गाव‌ गुंडावर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी शेत मजूर संजय क्षीरसागर यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

Mumbai University Exams | मुंबई विद्यापीठ, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल!

Devendra Fadnavis On Opposition | देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

Shantigiri Maharaj | नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरल्यानं दिवसभर चर्चा, शांतीगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?, Exclusive Video

SCROLL FOR NEXT