संभाजीनगरच्या वाळूजमध्ये घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं समाजमन सुन्न झालंय. कारण सैराटसारख्या आणखी एका घटनेनं महाराष्ट्र हादरलाय....बहिणीचं प्रेम प्रकरण मान्य नसल्याने भावानेच डोंगरावरून ढकलून देत बहिणीचा खून केला. घटनेचा हा ट्रॅजिक क्लायमॅक्स असला तरी ही करुण स्टोरीला सुरूवात झाली ती जालना जिल्ह्यातून...अंबड तालुक्यातील शहागडची नम्रता शेरकर बारावीत शिकत होती.
गावातील एका तरुणावर तिचं प्रेम जडलं. मात्र जात आडवी आल्यानं ते दोघेही गावातून पळून गेले. मात्र शेरकर कुटुंबीयांनी तिची समजूत घातली आणि तिला परत आणली. मात्र हार मानेल ते प्रेम कसलं? याची जाणीव असल्यामुळेच नम्रताचं मतपरिवर्तन करण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला वाळूजला तिच्या काकांकडे पाठवलं...मात्र आपल्या मुलीला पुन्हा कधी पाहू शकणार नाही याची पुसटशी कल्पनाही तिच्या वडिलांना नव्हती..
कारण तिचा चुलत भाऊ ऋषिकेशचाही या प्रेमाला विरोध होता..त्यामुळे त्यानं नम्रता गोडीगुलाबीत गावाजवळच्या डोंगरावर नेलं...आधी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र नम्रता आपल्या निर्णय़ावर ठाम असल्यामुळे संतापलेल्या ऋषिकेनं आपल्या बहिणीला निर्घृणपणे थेट डोंगरावरून खाली ढकललं...रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नम्रताचा या डोंगराच्या पायथ्याशी अंत झाला.
हृदयाचा थरकाप उडवणारा हा सारा प्रकार डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेली क्रिकेटची मॅच शूट करणाऱ्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या ऋषिकेशला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केला. जिच्याकडून राखी बांधून घेतली त्याच हातानं निदर्यी भावानं बहिणीची हत्या केली. ऋषीकेश हा गुन्हेगारी प्रवृतीचा आहे. काही गुन्ह्यांमध्ये तो तुरुंगातही होता. नम्रताची हत्या करणाऱ्या ऋषिकेषला शिक्षा होईलही. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात जात कधीपर्यंत प्रेमाचा घात करून तरुण तरुणींच्या जीवावर उठत राहणार हा खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.