शेतकरी महिलेचा प्रामाणिकपणा; फोन पे वरून चुकीने खात्यात आलेले पैसे परत केले संजय राठोड
महाराष्ट्र

शेतकरी महिलेचा प्रामाणिकपणा; फोन पे वरून चुकीने खात्यात आलेले पैसे परत केले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - शेतकऱ्यांना फुकटाचं काहीच नकोय, रक्ताचं पाणी करून मातीत सोन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना राब राब राबून कधी कधी कवडीमोल भावात शेत माल विकावा लागतो. मात्र यवतमाळ (yavatmal) जिल्हातील आर्णी येथे एका शेतकरी महिलेने प्रामाणिकपणा दाखवत चुकीने फोन पे (phone pay) वरून खात्यात जमा झालेली ५० हजाराची रक्कम परत केली आहे. (honest female farmer gives 50 thousand rupees back to person who send money by mistake)

हे देखील पहा -

सध्या सायबर क्राईमच्या (cyber crime) माध्यमातून बॅक खात्यात असलेली रक्क्म उडविण्याचा घटना घडत आहेत. अशाही वातावरणात प्रामाणिकपणा (honesty) जिवंत ठेवणारी व्यक्ती असल्याचा प्रत्यय आर्णी तालुक्यातील शारी येथील शेतकरी महिलेने दिला. चुकीने खात्यात आलेले पैसे एका शब्दावर बॅंकेतून काढून दिले. अमोल देशमुख यांनी मित्राला दि. २६ जुलै रोजी फोन पे वरून ५० हजार रुपयांची रक्कम पाठविली. त्यांच्याकडे पैसे मिळाल्याची खातरजमा केली असता मित्राने पैसे मिळाले नाही असे सांगितले, त्यामुळे अमोल देशमुख यांना धक्काच बसला. ५० हजार रूपये गेले कुठे या चिंतेत अमोल देशमुख यांनी संपूर्ण रात्री जागुन काढली.

सकाळी बॅंकेत जाऊन चौकाशी केली असता ती ५० हजारांची रक्कम शारी येथील विमल वामन राठोड यांच्या खात्यात गेल्याचे समजले. त्यानंतर अमोल यांनी शेतकरी महिला विमल बाई यांना हा प्रकार सांगितला आणि विमल बाई यांनी एका शब्दावर खात्यात जमा झालेली रक्कम काढून दिली. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशावेळी शेतकरी महिलेच्या खात्यात आयतेच ५० हजार रुपये आले, अशा प्रसंगात कोणाचीही नियत फिरली असती. मात्र विमल बाई यांनी अडचणीतही प्रामाणिकपणा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT