Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

राऊतांवरील ED कारवाईने शिवसेना डगमगणार नाही - गृहराज्यमंत्री

'ही कारवाई सूडबुद्दीने आणि मानसिक त्रास द्यायचा म्हणून केली आहे. मात्र अशा कारवायांनी शिवसेना डगमगणार नाही'

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

सातारा : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग आणि दादर येथील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे या कारवाई विरोधात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी टीका केली आहे. केंद्रातील लोकांविरुद्ध जे बोलतायत आणि मुद्दाम जुनी प्रकरणे बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू असल्याचे देसाई यांनी म्हणाले आहेत. कोणी कितीही त्रास दिला,अडचणी आल्या तरी शिवसेना डगमगणार नाही असं देसाई म्हणाले.

ते म्हणाले, ही कारवाई सूडबुद्दीने आणि मानसिक त्रास द्यायचा म्हणून केली आहे. मात्र अशा कारवाईंना शिवसेना डगमणार, घाबरणार नाही ती धाडसान पुढं जाणारं असल्याचंही देसाई म्हणाले.

हे देखील पहा -

तसंच आमचे नेते संजय राऊतांची आक्रमकता आणि निर्भीडपणा सर्वांना माहित आहे त्यामुळे राऊत देखी डगमणार नाहीत आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असही गृहराज्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राउत यांच्यावर टीका केली आहे. या बाबत शंभूराज देसाई यांना विचारले असता त्यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

किरीट सोमय्यांकडे किती लक्ष द्यायचं हे आता ठरवायची वेळ आली आहे. ते नेहमीच आरोप करत असतात जुन्या कोणत्या तरी गोष्टी काढायच्या आणि त्यावर आरोप करायचे ही त्यांची सवय होऊन बसली आहे त्यामुळे शिवसेना अशा तथ्यहिन आरोपांकडे फारसे लक्ष देत नाही असही ते म्हणाले.

Edited By -Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी प्रश्न पुरवण्याचा बदल्यात हवालदार यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट

Crime News: खोलीत बोलवून जबरदस्तीने किस, नंतर प्राइव्हेट पार्टला...; बॉक्सिंग कोचचं अल्पवयीन तरुणीसोबत विकृत कृत्य

कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, पाहा VIDEO

PM Modi - Donald Trump : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा PM मोदींसाठी महत्वाचा निरोप; व्हाइट हाऊस भेटीचं निमंत्रण धाडलं

साडीवर ट्राय करा 5 सोप्या आणि स्टायलिश हेअरस्टाईल्स; लग्नात मिळेल परफेक्ट ट्रेडिशनल लूक

SCROLL FOR NEXT