Holi Special Train 2025 Saam Tv
महाराष्ट्र

Holi 2025: रेल्वेकडून प्रवाशांसाठी खुशखबर! होळीसाठी पुण्यातून तेरा जादा ट्रेन , प्रवाशांच्या सुविधेसाठी टाकला मंडप

Pune Railway Station Special Arrangements: उन्हाळ्याच्या सुट्टीत लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन पुणे रेल्वे विभागानं होळीनिमित्त प्रवाशांसाठी खास व्यवस्था केली आहे.

Bhagyashree Kamble

उन्हाळ्याच्या सुट्टीत लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन पुणे रेल्वे विभागानं होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण १३ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर मोठा मंडप टाकण्यात आलाय. प्रवाशांसाठी खास व्यवस्था रेल्वेकडून करण्यात आलीय. याची माहिती पुणे विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष राजेश कुमार वर्मा यांनी दिलीय.

कसं असेल वेळापत्रक?

पुणे दानापूर विशेष गाडी क्रमांक ०१४१९ विशेष ट्रेन पुणे येथून ११ मार्च रोजी १९.५५ मिनिटांनी सुटेल. तसेच तिसऱ्या दिवशी ४.३० वाजता दानापुरात पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२० ही विशेष ट्रेन दानापूर येथून १३ मार्च रोजी ६.३० वाजता सुटेल आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी १७.३५ वाजता पोहोचेल.

पुणे – मालदा टाउन विशेष ट्रेन (२ फेऱ्या) गाडी क्रं (०३४२६) विशेष ट्रेन पुणे येथून २३.०३.२०२५ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १६.३० वाजता मालदा टाउन येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०३४२५ ही ट्रेन मालदा टाऊन येथून २१ मार्च रोजी १५.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ११. ३५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.

हडपसर-हिसार विशेष ट्रेन (४ फेऱ्या) गाडी क्रं (०४७२६) ही विशेष ट्रेन हडपसर येथून १०.०३.२०२५ आणि १७.०३.२०२५ रोजी १७.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२.२५ वाजता हिसार येथे पोहोचेल. गाडी क्रं (०४७२५) ही विशेष ट्रेन हिसार येथून ०९.०३.२०२५ आणि १६.०३.२०२५ रोजी ०५.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.४५ वाजता हडपसर येथे पोहोचेल.

कलबुर्गी- सर एम विश्वसरया टर्मिनल बेंगळुरू विशेष - (४ फेऱ्या) गाडी क्रं (०६५२०) ही विशेष ट्रेन कलबुर्गी येथून १४.०३.२०२५ आणि १५.०३.२०२५ रोजी ०९.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.०० वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०६५१९ ही विशेष ट्रेन बंगळुरू येथून १३ मार्च आणि १४ मार्च रोजी रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७. ४० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT