Pune Swargate: दत्ता गाडेला पुणे सत्र न्यायालयाचा दणका, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

Datta Gade Judicial Custody: पुणे सत्र न्यायालयानं दत्ता गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडेची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
Datta Gade's Mobile Under Investigation
Datta Gade's Mobile Under InvestigationSaam Tv News
Published On

स्वारगेट बस डेपोतील तरूणीवर बलात्कारप्रकरणी पुणे सत्र न्यायालयानं आरोपी दत्ता गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडेची आज पोलीस कोठडी संपत असल्यामुळे, पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुणे सत्र न्यायालयानं दत्ता गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडेची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

स्वारगेट तरूणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. दत्ता गाडेची आज पोलिस कोठडी संपत असल्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर केलं आहे.

Datta Gade's Mobile Under Investigation
Political News: विरोधी पक्षनेते पदाचा तिढा कायम, भास्कर जाधवांना पाठिंबा नाहीच; काँग्रेसला मात्र लोकलेखाच्या अध्यक्षपदाचे वेध

आरोपी दत्ता गाडेला पुणे सत्र न्यायालयाने स्वारगेट बलात्कार प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडेची गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीतून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Datta Gade's Mobile Under Investigation
Santosh Deshmukh: फरार कृष्णा आंधळे नाशकात, स्थानिकांचा दावा; पोलिसांची धावपळ

स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराचा प्रकार घडला. यानंतर आरोपी दत्ता गाडे फरार झाला होता. तब्बल ७५ तासानंतर आरोपी दत्ता गाडे पोलिसांच्या तावडीत सापडला. दत्ता गाडेला अटक केल्यानंतर तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. दत्ता गाडे स्त्रीलंपट असून, त्यानं अनेक महिलांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता.

बलात्कारप्रकरणी दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com