sangli, miraj, holi celebration 2023, holi 2023 saam tv
महाराष्ट्र

Viral Video : महिलांनी पुरुषांना काठीनं बदडलं ! जाणून घ्या Holi ची प्रथा परंपरा

Holi Traditions: हाेळीनंतर साधारणत: दाेन तीन दिवसांनी ही परंपरा आजही सांगली जिल्ह्यात जाेपासली जात आहे.

विजय पाटील

Sangli Holi Festival: राज्यातील विविध भागात हाेळी निमित्त वर्षानुवर्ष असलेल्या परंपरेची जाेपासना यंदा देखील केल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या दीडशेहून अधिक काळ सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात पुरुष मंडळींना महिलांकडून काठीने बदडून काढण्याची (झेंड्यांचा खेळ) प्रथा- परंपरा आजही जाेपसली गेली. या खेळाचे व्हिडिओ समाज माध्यमातून देखील व्हायरल हाेऊ लागले आहेत. (Maharashtra News)

ही प्रथा परंपरा गोसावी समाजातील आहे. याला "झेंड्याचा खेळ" म्हणून देखील संबाेधिले जाते. या प्रथेमुळे महिलांना वर्षातून एकदा पुरुषांना मनसोक्त बदडून काढायची संधी मिळते असेही समाजातील महिलांचे म्हणणे आहे. हे सर्व खेळीमेळीत घेतले जाते अशी पुरुषांची भावना आहे.

यंदा होळीच्या तिसऱ्या दिवशी 'झेंड्याचा खेळ' हा पारंपारिक खेळ खेळला गेला. गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधण्यात आला. ज्याची कमान ही महिलांची हाती हाेती. सर्व महिला या झेंड्याची रक्षण करण्यासाठी हातात काठ्या घेऊन हाेत्या.

रंगांची उधळण करत पुरुषांनी तो झेंडा पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला त्यांना तसे करण्यापासून राेखताना दिसून आल्या. यावेळी पुरुष मंडळींना पिटाळून लवण्यासाठी महिलांनी त्यांना काठीने बदडून काढले.

गेल्या दीडशे वर्षांपासून (miraj) येथे ही परंपरा जाेपासली जात आहे. पत्नीकडून पती या निमित्ताने आनंदाने मार खात असतात हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे. हे सर्व खेळीमेळीत चालते असेही वंदना गोसावी आणि शेखर गोसावी यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tara Sutaria: लाल इश्क...; तारा सुतारियाचा बनारसी साडीतील रॉयल लूक

India vs Australia Hobart T20I: वॉशिंगटनची अति 'सुंदर' खेळी; टी२०मालिकेत १-१ ने बरोबरी

ऑफिसमध्ये लाइट बंद करण्यावरून वाद पेटला; सहकारी कर्मचाऱ्याने डंबल फेकून मारला, ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Politics: शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तर...,शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजपला सज्जड दम? VIDEO

Maharashtra Live News Update: कोंढवा हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT