CM Eknath Shinde, Pandharpur Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News : '...अन्यथा पंढरपूर दौ-यावर येणा-या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार'

CM Eknath Shinde हाेलार समाजाच्या मागण्या करणार का ?

भारत नागणे

Holar Samaj News : होलार समाजासाठी महामंडळ स्थापन करावे अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा स्वाभिमानी होलार समाज संघटनेने आज (बुधवार) पंढरपूर येथे दिला आहे. (Maharashtra News)

स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी जावीर म्हणाले आर्थिक आणि सामाजिक विकासा पासून आणि शैक्षणिक सुविधा पासून राज्यातील हाेलार समाज वंचित राहिला आहे. राज्यातील होलार समाजाच्या विकासासाठी सरकराने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी जावीर यांनी केली आहे.

जावीर म्हणाले राज्यात सुमारे 40 लाख होलार समाज आहे. समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. समाजाच्या विकासासाठी सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अभ्यास आयोग स्थापन करावा, महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणा-या संभाजी भिडेंवर कारवाई करावी.

दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास येत्या 26 ला पंढरपूर दौ-यावर येत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवाजी जावीर यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल प्रकरणात नवीन अपडेट, केतनला सिया आणि चेतनचा होता संशय

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी डेब्यू कधी करणार? आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही नाही मिळाली संधी

धारशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट, पवनराजेंची हत्या, संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर वेगळाच संशय

Dombivli Crime: तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, संतप्त नागरिकांनी धडा शिकवला; डोंबिवलीतील संतापजनक घटना

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

SCROLL FOR NEXT