Hingoli Yavatmal News: Women Protest Against Municipality for Water Saam TV
महाराष्ट्र

Hingoli-Yavatmal Water News: पाण्यासाठी वसमतमध्ये महिलांचा पालिकेवर हंडा मोर्चा; वणी शहरातही बारा दिवसाआड पाणी पुरवठा

Hingoli-Yavatmal Water Crisis News: पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या महिला नागरिकांनी आज डोक्यावरील हांडे थेट पालिका प्रशासनाच्या दारात आणून ठेवले आहेत.

Rajesh Sonwane

संदीप नागरे/ संजय राठोड 
हिंगोली/ यवतमाळ
: यंदा पाण्याची तीव्रता अधिक आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याची समस्या जाणवत असल्याने वसमतमध्ये संतप्त महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात देखील तब्बल बारा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे.  

हिंगोलीच्या (Hingoli) वसमत शहरातील काही भागात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. नागरिकांना दैनंदिन पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या महिला नागरिकांनी आज डोक्यावरील हांडे थेट पालिका प्रशासनाच्या दारात आणून ठेवले आहेत. तातडीने (Water Scarcity) पाणीटंचाई दूर करा, अन्यथा पालिकेच्या दारातून उठणार नसल्याचा पवित्रा या महिला नागरिकांनी घेतल्याने वसमत पालिकेत काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. 

वणी शहरात बारा दिवसाआड पाणीपुरवठा


यवतमाळ
: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी शहरात देखील पाणी टंचाई जाणवत आहे. शहर वासियांना तब्बल दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे मनसेच्या वतीने आज नगरपरिषदमध्ये ठिय्या आंदोलन करून मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. तसेच मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑक्टोबर - नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Accident : खडीने भरलेल्या ट्रकची प्रवासी बसला जोरात धडक, २० जणांचा जागेवरच मृत्यू, अनेकजण जखमी

3 November 2025 Rashi Bhavishay: करिअर अन् आर्थिक स्थिती सुधारणार, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा?

Pancreatic Cancer: तुमच्या पायात दिसतोय का 'हा' बदल? जीवघेण्या कॅन्सरची असू शकते लक्षण, तज्ज्ञांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT