Hingoli Student Dies in Japan 
महाराष्ट्र

हादरवणारी बातमी! जापानमध्ये हिंगोलीच्या २५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं झालं काय?

Hingoli student death : हिंगोलीच्या २५ वर्षीय श्याम संतोष अग्रवाल या विद्यार्थ्याचा जपानमधील कुरे शहरात पोहताना दुर्दैवी मृत्यू झाला. IIT खरगपूरच्या एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत तो हिरोशिमा विद्यापीठात प्रशिक्षणासाठी गेला होता.

Namdeo Kumbhar

संदीप नागरे, हिंगोली प्रतिनिधी

Hingoli Student Dies in Japan : हिंगोली येथील एका २५ वर्षांच्या तरुणाचा जपानमध्ये पोहताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्याम संतोष अग्रवाल असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. श्यामच्या निधनाची बातमी एका संदेशाद्वारे त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. या घटनेमुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्याम याच्या मृत्यूची बातमी समजताच हिंगोलीकरांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. श्याम हा आयआयटी खरगपूर (IIT Kharagpur) येथे 'मास्टर ऑफ आर्किटेक्चर'चे शिक्षण घेत होता. 'आयआयटी एक्सचेंज' कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाकडून त्याची ६ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. त्यानुसार तो गेल्याच महिन्यात जपानमधील हिरोशिमा विद्यापीठात पोहोचला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जपानच्या कुरे शहरातील 'कारुगा बीच पार्क' येथील स्विमिंग पूलमध्ये श्याम पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, काही वेळ उलटूनही तो बाहेर आलाच नाही. थोड्या वेळाने जीवरक्षकांना त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

पुढील आठवड्यात पार्थिव महाराष्ट्रात आणणार

भारत सरकारकडून श्यामचे पार्थिव (मृतदेह) मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठवड्याभरात त्याचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे आणले जाईल आणि तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारचे शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

Apple CEO Resign : Apple चे CEO टिम कुक यांचा राजीनामा! सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; नवे सीईओ कोण? जाणून घ्या

Jeeryach Paani: जिऱ्याचं पाणी की अॅपल सायडर व्हिनेगर? वजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावं?

Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने कृत्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

SCROLL FOR NEXT