Hingoli: एसटी कंडक्टरचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli: एसटी कंडक्टरचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

तुमची दिवाळी आनंदात साजरी करू शकलो नाही असे सांगत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंगोली - एसटी कंडक्टरने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची दिवाळी आनंदात साजरी करू शकलो नाही, असे सांगत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती माहिती कुटुंबीयांनी दिली. रमेश टाळकुटे असे या आत्महत्या केलेल्या आगारातील कर्मचाऱ्याचेचे नाव आहे. त्यांची नेमणूक हिंगोलीच्या कळमनूरी आगारामध्ये होती.

हे देखील पहा -

रमेश यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांना माहिती देत, मला माफ करा, तुमचा दिवाळी सण आनंदात मी करू शकलो नाही त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगत फोन बंद केला. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने रमेश यांचा शोध घेत अत्यवस्थ झालेल्या रमेशला हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या घटनेनंतर हिंगोलीत आता एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हा रुग्णालयांमध्ये गर्दी करत, राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT