hingoli revenue department seized 2 thousand brass sand worth rs 6 crore
hingoli revenue department seized 2 thousand brass sand worth rs 6 crore saam tv
महाराष्ट्र

Hingoli : भाजप आमदारांच्या उपाेषणानंतर हिंगाेली जिल्ह्यात सहा काेटींची वाळू जप्त, जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन

संदीप नागरे

Hingoli News :

राज्यात सरकारने गरिबांना घरे बांधण्यासाठी स्वस्त दरात वाळू मिळावी म्हणून नवे वाळू धोरण तयार केले होते. शासनाच्या नव्या वाळू धोरणाप्रमाणे सहाशे रुपये प्रति ब्रास दराने वाळू मिळत असल्याने कमी खर्चात गरिबांचे घर उभे राहत होते मात्र मराठवाड्याच्या (marathwada) हिंगोली जिल्ह्यात वाळू माफियांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत गरिबांच्या वाळूवर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. (Maharashtra News)

पूर्णा व कयाधू नदीच्या पात्रातून अवैध वाळू साठा जमा करत बनावट शासकीय पावत्यांच्या आधारे चढ्या दरात वाळूची विक्री सुरू असल्याचा आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (mla tanaji mutkule) यांनी करत जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण सुरू केले होते. त्यानंतर आमदार तानाजी मुटकुळे यांनी वाळू चोरीचा संपूर्ण प्रकार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (jitendra papalkar) यांच्या लक्षात ही आणून दिला होता.

आमदार मुटकुळे यांच्या उपोषणानंतर खडबडून जागे झालेल्या हिंगोलीच्या महसूल प्रशासनाने औंढा तालुक्यातील चिमेगाव, भगवा, माथा, रुपुर गावच्या शिवारात छापा टाकत वाळू माफियांनी साठवणूक केलेली दोन हजार ब्रास वाळू जप्त केली.

बाजारात या वाळू साठ्याची किंमत तब्बल सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आता शासकीय धोरणानुसार ही वाळू गरिबांना केवळ सहाशे रुपये प्रति बरास दराने विक्री करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बांधकामासाठी ज्या नागरिकांना वाळूची गरज आहे अशा नागरिकांनी शासनाच्या ऑनलाइन पोर्टल वर नोंदणी करून या वाळूची खरेदी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT