Political Shakeup in Hingoli Saam
महाराष्ट्र

शिंदेंचा काँग्रेसला जबरी धक्का, सलग ३ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

Political Shakeup in Hingoli: हिंगोलीत राजकीय घडामोडींना वेग. काँग्रेस नेते भाऊराव पाटील यांची शिंदे गटात एन्ट्री. शिंदें गटाची ताकद वाढली.

Bhagyashree Kamble

  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींमा वेग.

  • हिंगोलीत काँग्रेसला खिंडार.

  • शिंदे गटात बड्या नेत्याची एन्ट्री.

पुढच्या काही महिन्यांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शक्य असेल त्या ठिकाणी काही नेत्यांनी एकला चलो रेची भूमिका घेतली असल्याचं दिसतंय. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हिंगोलीत काँग्रेसला धक्का बसला असून, एकनाथ शिंदेंची ताकद वाढली आहे.

हिंगोलीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते भाऊराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाऊराव पाटील हे काँग्रेस पक्षाकडून सलग तीनवेळा आमदार राहिले होते. मात्र, मागच्या तीन विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आता त्यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. भाऊराव पाटील हे लवकरच शिवसेना शिंदे गटात करतील. थोड्याच वेळात पाटील मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. मु्ंबईत पोहोचल्यानंतर शिवसेना शाखेत जाऊन धनुष्यबाण हाती घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातआहे.

हिंगोलीत दुष्काळानंतर शेतकऱ्यांवर दुसरं संकट ओढवलं

दुष्काळ आणि अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांवर पुन्हा एक नवे संकट ओढवले आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने वखार महामंडळाकडून बांधण्यात आलेल्या शासकीय गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा माल सडला आहे. त्यामुळे हिंगोलीत शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल माल हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवला होता. मात्र, शेतकऱ्यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेले धान्य खराब झाले आहेत. शेतमाल नष्ट झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badnera Crime : बडनेऱ्यात ढाबा चालक, महिलेला मारहाण; पोलिसात तक्रार दाखल

CM : मुलींना रात्री बाहेर जाऊ देऊ नये, सामूहिक बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

Maharashtra Live News Update : स्वच्छता कर्मचाऱ्यांना मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित दिवाळी भेट

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या भाषणात मोठा गोंधळ; नेमके काय घडले? VIDEO

निवृत्त बँक कर्मचाऱ्यानं बायको अन् मुलासह घरातच आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमुळे गूढ वाढलं

SCROLL FOR NEXT