हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शिंदगी गावात सासु व सुनेने जिद्द व चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळविले आहे. या गावात सासूबाई गावच्या सरपंच तर त्यांची सून पोलीस पाटील ते (Police) पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाली आहे. (hingoli news Sub Inspector of Police stubbornly)
मीनाक्षी गंगाधर मगर असे पोलीस उपनिरीक्षक झालेल्या सूनबाईचे तर सत्वशिला मगर असे गावच्या सरपंच (Hingoli News) झालेल्या सासूबाईचे नाव आहे. विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक झालेल्या मीनाक्षी यांना (Marriage) विवाहानंतर एक आपत्य झाले. त्यानंतर त्या गावच्या पोलीस पाटील देखील बनल्या मात्र त्यांच्या सासूबाईची इच्छा त्यांनी पोलीस दलात अधिकारी व्हावे; अशी असल्याने त्यांनी कामाला लागत हे घवघवीत यश मिळविले.
ट्रेनिंग घेवून परतल्या गावी
नाशिक (Nashik) पोलीस करिअर अकॅडमी वर्षभराचे प्रशिक्षण पूर्ण करून मीनाक्षी मगर या सोमवारी आपल्या मूळ गावी सिंग येथे पोहोचल्या. यानंतर त्यांच्या सासुबाईसह गावकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. गावकऱ्यांनी या दोघींचाही फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य स्वागत समारंभ करत अभिनंदन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.