st strike saam tv
महाराष्ट्र

St News: जेवणाच्या डब्‍यात दारूची बाटली; एसटीवर नेमलेला चालक मद्याच्‍या नशेत

जेवणाच्या डब्‍यात दारूची बाटली; एसटीवर नेमलेला चालक मद्याच्‍या नशेत

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढीत प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने चालत नेमले आहे. परंतु, हे नेमलेले चालक चक्क मद्यप्राशन करून एसटी चालवताना आढळून आले. याबाबत प्रवाशांच्या तक्रारीनंतर पंचनामा झाला. (hingoli news st- trike st driver assigned to the ST is intoxicated)

हिंगोलीत (Hingoli) एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St Strike) मोडीत काढून प्रवाशांच्या सोईसाठी काही प्रमाणात बसेस सुरू केल्या आहेत. मात्र या बसेस चालविण्यासाठी महामंडळाने ज्या एसटी चालकांना सहभागी केले; ते चालक चक्क मद्यप्राशन करून एसटी (MSRTC Bus) चालवत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळमणुरी आगारातील एक बस आज परभणीमार्गे जात असताना एसटी चालक नागोराव डुकरे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा प्रकार एसटीने प्रवास करणारे प्रवाशी उल्हास दिवाळकर यांच्या निदर्शनास आला.

जेवणाच्या डब्‍यात दारूची बाटली

गाडीमध्ये ऐकून १२ प्रवाशी प्रवास करत असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यामुळे त्यांनी तातडीने हा प्रकार पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून कळविला. पोलिसांनी (Police) चौकशी केली असता हा चालक मद्य पिऊन गाडी चालवत असल्याचे स्पष्ट झाले. या चालकाच्या जेवणाच्या डब्यातील पिशवीत देखील देशी दारूच्या बॉटल आढळून आल्या. त्यामुळे प्रवासी उल्हास दिवाळकर यांनी हिंगोली आगारातील व्यवस्थापक यांच्यासह हिंगोली पोलिसात रीतसर तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

Delhi Capitals: दिल्लीच्या नव्या कर्णधाराचं नाव ऐकून व्हाल हैराण; ऋषभ पंतनंतर कोण सांभाळणार कमान?

SCROLL FOR NEXT