जळगाव : शहरात कोरोना संक्रमणाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. खेाटेनगरातील एका दाम्पत्याला पोलिसांनी थांबवल्यावर या दाम्पत्याने दंड तर भरलाच नाही. उलट पोलिसांशी (Police) हुज्जत घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news corona rules Unmarked couple fights with police)
जळगाव (Jalgaon) शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात नमूद केल्याप्रमाणे, नारायण जगताप (वय ३६) व पत्नी दिपाली जगताप (वय ३०, रा. खोटेनगर) असे दोघेही त्यांच्या वाहनाने टॉवर चौकातून बाजारात जात होते. यावेळेस टॉवर चौकात विनामास्क फिरत असलेल्या नागरिकांवर कारवाई सुरू (Corona Rules) असल्याने पोलिस पथकाने जगताप दाम्पत्यास थांबवून दंडाची मागणी केल्यावर दोघांनी दंड भरण्यास नकार देत वाद घातला.
आरडा ओरड करत केली शुटींग
दोघांना जवळच पेालिस (Jalgaon Police) ठाण्यात नेण्यात आल्यावर पत्नी दिपाली यांनी मोबाईल काढून त्याद्वारे शूटींग काढून आरडा- ओरड केली. तसेच, पती नारायण यांनी पोलिस वाळू वाल्यांकडून हप्ते घेतात. आम्ही उपोषणाला बसणार अशी धमक दिली. कोरोना नियमांचे उल्लंघन आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पती- पत्नीविरुद्ध शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक अरुण सोनार करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.