Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : विद्यार्थ्यांची खाजगी संस्थेत आर्थिक पिळवणूक; प्रवेशासाठी २० हजार रुपये आकारल्याचा आरोप

Hingoli News : महाविद्यालयातील प्राचार्य अभिषेक बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा किंवा नाही याचा अधिकार संस्था चालकाने राखून ठेवला असल्याचे सांगत प्रवेश नाकारला आहे

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीत अकरावी आणि बारावीच्या प्रवेशासाठी खाजगी संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यात प्रवेशासाठी २० हजार रुपये आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कोळसा परिसरात असलेल्या विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गंभीर बाब म्हणजे या महाविद्यालयातील प्राचार्य अभिषेक बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा किंवा नाही याचा अधिकार संस्था चालकाने राखून ठेवला असल्याचे सांगत प्रवेश नाकारला आहे.  

पैशांचा संस्थेची संबंध नसल्याचा दावा  

विद्यार्थ्यांबाबत संस्था चालकांकडून असा प्रकार करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान या संदर्भात शाळेतील कर्मचारी पैसे घेतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल माध्यमात सध्या मोठा प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र या शाळेतील कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आलेल्या पैशाचा संस्थेची काहीही संबंध नसल्याचा दावा संस्था चालकाकडून करण्यात आला आहे. 

छावा संघटनेकडून कारवाईची मागणी 

दरम्यान या प्रकरणी छावा संघटनेच्या वतीने राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संस्थेविरोधात कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेने नाकारला, त्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर या शाळेत नंबर लागला होता. तरी देखील प्रवेश नाकारल्याचा आरोप या विद्यार्थ्यांसह छावा संघटनेचे पदाधिकारी हनुमान गाढवे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सत्ताधाऱ्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही अडवल्यात - उद्धव ठाकरे

Podi Idli Recipe: रोजच्या नाश्त्याला द्या हटके ट्विस्ट; बनवा साउथ इंडियन स्टाईल पोडी इडली

Akola : सोन्याचे विक्रमी दर; अकोल्यात मात्र कमी भावात सोनं, काय आहे नेमकं प्रकरण वाचा

New LIC Policy: LIC ने लाँच केल्या २ जबरदस्त योजना! कमी प्रिमियमवर मिळणार भरघोस परतावा; वाचा संपूर्ण माहिती

KDMC News : आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, पालिकेकडून बोनस जाहीर, खात्यात पैसे कधीपर्यंत येणार?

SCROLL FOR NEXT