Painganga River Flood Saam tv
महाराष्ट्र

Painganga River Flood : पावसाचे नव्हे तर पुराने थैमान; विदर्भातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर, हिंगोलीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Hingoli News : विदर्भात धुवाधार सुरू असलेला पाऊस आणि विदर्भात कोसळलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगेने शेतकऱ्याच्या शेतात एन्ट्री केली

संदीप नागरे

हिंगोली : राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी तर पेरणीला उसंत देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यानुसार विदर्भात देखील पावसाने थैमान घातले असून विदर्भात पडलेल्या पावसाचा फटका हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. कारण विदर्भातून वाहत येणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आल्याने हे पुराचे पाणी हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतशिवारात गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी विचित्र संकटात सापडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पेरणी केलेली पिके सुकून जात असल्याने आभाळातून पाण्याची वाट पाहत असताना शेतकऱ्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. कारण विदर्भात धुवाधार सुरू असलेला पाऊस आणि विदर्भात कोसळलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगेने शेतकऱ्याच्या शेतात एन्ट्री केली. 

शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात 

पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे हिंगोली तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यात प्रामुख्याने कनेरगाव परिसरातील भगवती, तपोवन, गारखेडा, सवना गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठी असणाऱ्या शिवारातील शेतामध्ये पुराचे पाणी घुसल्याने उभी पिकं खरडून गेली आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

दोन दिवसांपूर्वी आलेले पुराचे पाणी अजूनही अनेक शेतामध्ये साचलेले असल्याने हळद, कापूस, तूर, उडीद, मूग यासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक लहान असल्याने ते खराब होत असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना या नुकसानीच्या खाईतून वाचवण्यासाठी आता पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MG Cyberster: १०० किमी प्रति तास वेगाने धावणारी सुपर कार लाँच; टेस्लाला देणार टक्कर

भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, कारगिल विजय दिनानिमित्त लष्कर प्रमुखांनी डागली तोफ

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धाचे कोड नेम काय होते? प्रत्येक भारतीयाला या १० गोष्टी माहित असायला हव्यात

Shivali Parab: एकदम झक्कास! ‘हास्यजत्रा’ फेम शिवालीचे हटके फोटोशूट पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT