Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime: मालकाचे पैसे रमी सर्कल गेम खेळून हरला; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Hingoli News : मालकाचे पैसे रमी सर्कल गेम खेळून हरला; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

संदिप नागरे

हिंगोली : हिंगोलीत चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांच्या चौकशीमध्ये एक विचित्र प्रकार पुढे आला आहे. (Hingoli) ऑनलाईन रामी गेम खेडतांना पैसे हरल्याने; रस्त्याने मारहाण करत पैसे चोरी झाल्याचा बनाव केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी तरुणासह अन्य दोघांवर (Police) गुन्हा दखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

ऑनलाइन रमी सर्कलवर गेम खेळताना पैसे हरल्याने एका तरुणाने आपल्याला चोरट्याने रस्त्यात अडवून मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र फिर्यादी तरुणाचा संशय आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली. यामध्ये तक्रारदार तरुण हा डेली न्यूज डिलिव्हरीचे (Crime News) काम करत होता. चोरीच्या घटनेच्या दिवशी हा तरुण ऑनलाइन रमी सर्कलवर गेम खेळताना पन्नास हजार रुपयांची रक्कम हरला होता.  

पैसे हरल्यानंतर मालकाला आता कुठून द्यायचे. हा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिल्याने या तरुणाने आपल्या दोन सहकारी मित्राच्या सहाय्याने चोरी झाल्याचा बनाव केला. मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच या सगळ्या बनावाची या तरुणाने कबुली दिली आहे, यानंतर आता बासंबा पोलिसांनी आरोपी तरुण नितीन चिपाडे याच्यासह त्यांच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT