Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : हिंगोलीत पाणी प्रश्न पेटला; इसापूर धरणात कयाधू नदीचे पाणी सोडण्यास विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

Hingoli News : नदीचे पाणी धरणात गेल्यास हिंगोली जिल्ह्याचा दुष्काळामुळे वाळवंट होईल; असा आरोप यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजी माने यांनी केला आहे. दरम्यान शासनाने जाहीर केलेली ही निविदा तातडीने रद्द करावी

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या कयाधू नदीवर बांधारा तयार करून ईसापुर धरणात पाणी सोडण्यासाठी शासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे. यानंतर हिंगोलीत पाणी प्रश्न पेटला आहे. आज हिंगोलीत सिंचन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळवल्यास सिंचन संघर्ष समितीचा विरोध आहे. नदीचे पाणी धरणात गेल्यास हिंगोली जिल्ह्याचा दुष्काळामुळे वाळवंट होईल; असा आरोप यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजी माने यांनी केला आहे. दरम्यान शासनाने जाहीर केलेली ही निविदा तातडीने रद्द करावी; अन्यथा निवडणुकीत याचा परिणाम भोगावा लागेल असा इशारा देखील यावेळी मोर्चेकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे.  

जिल्हाधिकारी कार्यलयावर घोषणाबाजी 

संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात जिल्ह्यातील शेकडो (Farmer) शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोह्चल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करत निविदा रद्द करण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : सर्व सरकारी बँका शनिवारी राहणार बंद; काय आहे व्हायरल सत्य? जाणून घ्या

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

Leftover Chapati Storage Tips: रात्री उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्या की नाही? शिळ्या होऊ नये म्हणून 5 सोप्या टिप्स वापरा

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

SCROLL FOR NEXT