Hingoli Zilha Parishad Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Zilha Parishad: हिंगोली जिल्हा परिषद इमारतीला आग; भडका उडाल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ

Hingoli News: आगीने रौद्ररूप धारण केल्याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागात शासकीय कामकाज करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेच्या इमारतीला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली होती. (Hingoli) दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीचा (Fire) भडका उडाल्याने आरडाओरड सुरु झाली. घाबरलेले सर्व कर्मचारी जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या बाहेर पळाले. (Maharashtra News)

हिंगोली जिल्हा परिषदेची इमारत तीन माजली आहे. सकाळी कामकाजाला सुरवात झाल्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या मजल्यावरील फर्निचर असलेल्या अभ्यागत कक्षासह व्हिडिओ कॉन्फरन्स रूमला ही आग लागली. काही क्षणात या आगीने रौद्ररूप धारण केल्याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागात शासकीय कामकाज करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने इमारत खाली करत सुरक्षित ठिकाण काढले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साहित्य जळून खाक 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हिंगोली पालिकेच्या अग्नीशामक विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेमधील साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

SCROLL FOR NEXT