Hingoli Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Heavy Rain : हिंगोलीच्या लोहरा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; पाझर तलाव फुटल्याने १० गावातील शेतीचे प्रचंड नुकसान

Hingoli News : राज्यात मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील पाऊस होत असून मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या दरम्यान हिंगोली तालुक्यातील लोहरा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर तलावाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेती उपयोगी साहित्य व शेतातील विद्युत रोहित्र देखील वाहून गेले आहे. 

राज्यात मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील पाऊस होत असून मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. तर लोहरा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे चित्र आहे. दरम्यान या पावसात (Hingoli) हिंगोली जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचा पाझर तलाव फुटला आहे. नव्यानेच या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र मध्यरात्री प्रचंड मुसळधार पाऊस कोसळल्याने या परिसरात ढगफुटी झाली आणि त्यामुळे तलाव अचानक फुटून या परिसरातील दहा गावांमधील शेतीचे नुकसान झालं आहे.  

पिंपळदरी, धोतरा, लोहरा, उमर, खोजा यासह इतर गावांतील शेतीचे नुकसान झाले आहे. फुटलेल्या तलावातील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने परिसरातील शेतातील आखाड्यांवरील शेती उपयोगी साहित्य देखील वाहून गेले आहे. ज्यामध्ये ठिबक सिंचन पाईप, नांगर, वखर अशा शेती उपयोगी साहित्याचा समावेश आहे. तर परिसरात विद्युत साहित्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. विद्युत रोहित्र वाहून गेले. तर अनेक ठिकाणी पोल आडवे पडल्याने पुढचे काही दिवस या भागात वीज पुरवठा देखील बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

SCROLL FOR NEXT