HIngoli News  Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : वखार महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाने शेतकऱ्यांचा माल सडला; गोडाऊनमध्ये शेकडो क्विंटल मालाची नासाडी

HIngoli News : भाव मिळत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी सोयाबीन, हळद, करडई, हरभरा इत्यादी हजारो क्विंटल माल हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवला होता.

संदीप नागरे

हिंगोली : दुष्काळ आणि अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांवर पुन्हा एक नवे संकट ओढवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वखार महामंडळाकडून बांधण्यात आलेल्या शासकीय गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा माल सडला आहे. त्यामुळे हिंगोलीत शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर पुन्हा एक संकट ओढवले आहे. 

बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल माल हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवला होता. यामध्ये सोयाबीन, हळद, करडई, हरभरा इत्यादी मालाचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कीड व बुरशी लागू नये; म्हणून सुरक्षित ठेवण्यासाठी महामंडळाकडून शुल्क देखील आकारण्यात येते. मात्र आता भाव मिळेल या आशेने ठेवलेला शेतमाल नष्ट झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  

हळद भिजली, सोयाबीन व हरभऱ्याच्या कीड 

धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांची हळद गोडाऊनमध्ये भिजली आहे. तर सोयाबीन व हरभरा मालाला कीड लागली आहे. या सगळ्या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी गोडाऊन व्यवस्थापनावर देखील शंका उपस्थित केली आहे. गोडाऊन मधील कर्मचाऱ्यांनी मालाचे वजन वाढवण्यासाठी त्यावर पाणी मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांच्या आरोपानंतर गोडाऊनमध्ये पाहणी 

शेतकऱ्यांच्या या तक्रारीनंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष पथक गोडाऊनमध्ये पाहणी साठी पाठवले होते. यामध्ये कृषी विभागाचे अधिकाऱ्यांसह सहकार विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांच्या पाहणीनंतर मोठ्या प्रमाणात मालाची नासाडी झाल्याची पुढे आले असून लवकरच या प्रकरणात कार्यवाही होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer: गुंतवणूकदारांची वाढली धकधक; चीनवर 100 टक्के टॅरिफ, अमेरिकेच्या निर्णयानं भारतावर काय होणार परिणाम?

Silver Purchases: बनावट चांदीच्या बारची होतेय विक्री, खरेदी करताना कोणती सावधगिरी बाळगावी? जाणून घ्या...VIDEO

Maharashtra Live News Update : अजित पवारांनी संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, यावर जगतापांनी बोलणं टाळलं

Accident News : प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात; एकाचा मृत्यू, ११ जण जखमी

Heart Disease: लाल मांस आणि बटर नाहीतर 'हे' पदार्थ खाल्याने वाढतो हार्ट अटॅकचा धोका

SCROLL FOR NEXT