Hingoli Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत महिनाभरात तीन वेळा अतिवृष्टी; मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

HIngoli News : 15 गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसोबत माती देखील नदीमध्ये वाहून गेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीची तयारी शेतात कशी करावी असा गंभीर प्रश्न बळीराजासमोर उभा टाकला आहे

संदीप नागरे

हिंगोली : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यात एकाच महिन्यात तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात असलेल्या १६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली असून खरीप हंगामातील कापूस, तूर, उडीद, मूग यासह हळदीच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात नांदेड, वाशीम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहिला आहे. मागील दोन आठवड्यांपासून तर सतत पाऊस सुरु असून अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीची झळ सहन करावी लागली आहे. मागील महिनाभरात तीन वेळेस अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात शेती पिकांसह मोठ्या प्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. 

१५ गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान 

हिंगोली तालुक्यातील पारडा, भिरडा, धोत्रा, भटसावंगी, सिरसम खुर्द, उमरखोजा, पातोंडा, सागद खेरडा, खानापूर, चिखली, वराडी, बोरजा, पिंपळदरी ,सांडस, दुर्गसांगी, पळसोना, डिग्रस वाणी लिंबीलोहरा यासह परिसरातील 15 गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसोबत माती देखील नदीमध्ये वाहून गेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीची तयारी शेतात कशी करावी असा गंभीर प्रश्न बळीराजासमोर उभा टाकला आहे.  

नुकसान भरपाईची मागणी 

५८ हजार हेक्टर सोयाबीन, २० हजार हेक्टरवर हळद, कापूस पिकांचे नुकसान, १० ठिकाणी गावालगत असलेले पूल वाहून गेले आहेत. तर १५ पेक्षा जास्त दुधाळ आणि शेती काम करणारी जनावरे वाहून गेली आहेत. यात नुकसानीबाबत शेतकऱ्यांना सरकारने आता तातडीने नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी; अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री हायवेवर थरार! १८ ते २० हल्लेखोरांचा बसवर अंदाधुंद गोळीबार; १८ प्रवाशांचं अपहरण, सिंध हादरलं

Accident: भीषण अपघात! ११ वाहनं धडाधड धडकली, नंतर पेटली; १३ प्रवासी जिवंत होरपळले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

New District: राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

Methi Usal Recipe: झणझणीत मेथी उसळ कशी बनवायची? वाचा गावरान रेसिपी

मध्यरात्री रक्तरंजित थरार! २ सख्ख्या भावांवर अंदाधुंद गोळीबार, जागीच सोडले प्राण

SCROLL FOR NEXT