Nanded : कष्टाने उभा केलेला संसार पाण्यात बुडाला; नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्त महिलांना अश्रू अनावर

Nanded News : नांदेड जिल्ह्यात या पूर परिस्थितीमुळे जवळपास तीन ते चार हजार नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. हि पूरस्थिती कधी कमी होणार याची प्रतीक्षा पुरग्रस्थांना आहे
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यात आतोनात नुकसान होत असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. यामुळे कष्टाने उभारलेल्या संसार पाण्यात बुडाला असून प्रशासनाने दोन दिवसाची केलेली सोय आमच्या जन्माला जाणार नाही; अशी भावना नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील महिलांनी व्यक्त केल्या. 

नांदेड जिल्ह्यात १९८३ नंतर पहिल्यांदाच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर कालपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु अद्याप देखील जिल्ह्यातील मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड जिल्ह्यात या पूर परिस्थितीमुळे जवळपास तीन ते चार हजार नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. हि पूरस्थिती कधी कमी होणार याची प्रतीक्षा पुग्रस्थाना आहे. 

Nanded News
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून विसर्ग; गोदावरी नदी तुडुंब, दुधना प्रकल्पाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर

कष्टाने उभारलेले संसार बुडाले 

दरम्यान नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हरनाळी आणि नागिनी या गावातील अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. जवळपास १ हजार ते १२०० लोकांना कुंडलवाडी येथील के रामलु मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. या गावातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कष्टाने उभा केलेला संसार या पुराच्या पाण्यात बुडाला. प्रशासनाने दोन दिवसाची केलेली सोय आमच्या जन्माला जाणार नाही अशा भावना पुरग्रस्त महिलांनी केल्या व्यक्त केल्या. 

Nanded News
Satara : ग्रामसभेत तुंबळ हाणामारी; रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांवरून वाद

पूरग्रस्त शेतकरी आणि गावकरी आक्रमक

नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाली असून पूरग्रस्त शेतकरी आणि गावकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांचा ताफा आडवत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. यामुळे प्रशासनाने तात्काळ आमची पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्त महिलांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com