Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून विसर्ग; गोदावरी नदी तुडुंब, दुधना प्रकल्पाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर

Jalna News : दोन दिवसापासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालीय असून जिल्ह्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ
Godavari River
Godavari RiverSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: जालना जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठ्यात वाढ झाली असून सध्या गोदावरी नदीपात्रामध्ये ६६ हजार २४ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्यामध्ये वाढ झाली आहे. सध्या जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. तर दुसरीकडे दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. 

जालना जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. नदी- नाल्यांना पूर आल्याने धरणाच्या पाणीपातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मागील दोन दिवसापासून जालना जिल्ह्यात सर्व दूर मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी जिल्ह्याती सर्वात मोठे जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने धरणातून गोदावरी नदी पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

Godavari River
Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

मराठवाड्यात सर्वदूर पावसामुळे गोदावरी तुडुंब भरून वाहत आहे. जालना जिल्ह्यातील शहागड येऊन वाहणाऱ्या गोदावरीत दुधडी भरून वाहताना दिसत आहे. जायकवाडीच्या १८ गेट मधून पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळे गोदावरी मध्ये सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाने गोदाकाच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Godavari River
Nanded Heavy Rain : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक गावांना फटका, झाडावर अडकलेल्या एकाला रेस्क्यू करून वाचविले

निम्न दुधना प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडले
जालन्यातील परतुर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठा झपाट्याने वाढ होत असून या प्रकल्पाचा पाणीसाठा आता ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या धरणाचे ४ दरवाजे उघडले असून ३ हजार ३२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com