Satara : ग्रामसभेत तुंबळ हाणामारी; रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांवरून वाद

Satara News : सभेतील चर्चेत काही लाभार्थ्यांनी रोजगार हमी योजनेत अन्याय झाल्याची तक्रार मांडली. या मुद्द्यावरून उपस्थितांमध्ये बोलाचाली वाढली. यातून थेट एकाला मारहाण करण्यात आल्याने हाणामारीपर्यंत विषय गेला होता
Satara News
Satara NewsSaam tv
Published On

सातारा : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची नावे व मजुरीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला. ग्रामसभेत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान अचानक उपस्थितांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद वाढून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. यामध्ये तुंबड हाणामारी झाल्याचे पाहण्यास मिळाले. 

साताराच्या कोरेगाव तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत कार्यालयात हा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत सभागृहात सुरू असलेल्या ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक देखील उपस्थित होते. सभेतील चर्चेत काही लाभार्थ्यांनी रोजगार हमी योजनेत अन्याय झाल्याची तक्रार मांडली. या मुद्द्यावरून उपस्थितांमध्ये बोलाचाली वाढली. यातून थेट एकाला मारहाण करण्यात आल्याने हाणामारीपर्यंत विषय गेला होता. 

Satara News
Satara : सातारकरांचे आयटी पार्कचे स्वप्न होणार पूर्ण; नागेवाडी परिसरातील सहा हेक्टर जागेचा झाला ड्रोन सर्वे

ग्रामसभेत तणावाचे वातावरण 

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ ग्रामसभेचे वातावरण तणावपूर्ण झाले. तर घटनेनंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र रोजगार हमी योजनेत पारदर्शकता राखावी व सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशी ग्रामस्थांची मागणी पुढे आली आहे.

Satara News
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून विसर्ग; गोदावरी नदी तुडुंब, दुधना प्रकल्पाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर

कळवा परिसरात कोयत्याने हल्ला
ठाणे : काही वर्षांपूर्वी निर्घृण खून करून शीर हातात घेऊन फिरल्याप्रकरणी ताब्यात घेतलेला गणेश शिंदे उर्फ काला गन्या हा पुन्हा एकदा शहरात दहशत माजवत असल्याचे समोर आले आहे. जेलमधून जामिनावर सुटल्यावर शिंदे कळवा परिसरात मुक्तपणे फिरताना दिसत होता. गुरुवारी कळवा पूर्व भागात काही नागरिकांसोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर स्थानिकांनी शिंदेला चांगलाच चोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com