Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : स्वतःच केला हल्ल्याचा बनाव; निवडणूक काळातील धक्कादायक प्रकार आला समोर, उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना अटक

Hingoli News : हिंगोली पोलिसांच्या तपासामध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राज्यात हलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारावर झालेले हल्ले हे बनाव असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे

संदीप नागरे

हिंगोली : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात वसमत विधानसभा मतदारसंघातील शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. मात्र या घटनेतील धक्कादायक सत्य समोर आले असून उमेदवारांनी स्वतःच हल्ला घडवून आणल्याचा बनाव केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

हिंगोली पोलिसांच्या तपासामध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राज्यात हलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारावर झालेले हल्ले हे बनाव असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे. विधानसभेत मतदानाच्या काही तास आधी कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के व वसमत विधानसभेचे शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार गुरु पादेश्वर महाराजांवर प्राणघातक हल्ले झाले होते.  

उमेदवारांचा बनाव 

डॉ. दिलीप मस्के व गुरु पादेश्वर महाराज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी हे हल्ले स्वतः घडवून आणले होते. वसमत मध्ये महाराजांच्या शिष्याने मतदान मिळावं म्हणून स्वतः गाडीवर दगडफेक केल्याचं पुढे आले आहे. अर्थात हे दोन्ही हल्ले एक बनाव असल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. 

उमेदवारांचे कार्यकर्ते ताब्यात 

कळमनुरी देखील यापूर्वी पोलिसांनी उमेदवाराला या गुन्ह्यात थेट अटक केली होती. दरम्यान आता वसमत पोलिसांनी गुरु पादेश्वर महाराजांच्या दोन शिष्यांना अटक देखील केली आहे. गुरु पादेश्वर यांच्यावर हल्ला करून गाडी फोडणारे भुजंग माधवराव नीरदोडे व संकेत भास्कर भोसले याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Shahid Kapoor : शाहिद कपूरचा थरारक अवतार; O Romeo चं फर्स्ट लूक पोस्टर पाहून अंगावर येईल काटा, चित्रपटाची रिलीज डेट काय?

Poha Chakali Recipe : वाटीभर पोह्यांची करा कुरकुरीत चकली, १५ मिनिटांत चटपटीत स्नॅक्स तयार

Ladki Bahin Yojana: मकरसंक्रांतीला लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार; पण 'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT