Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

Hingoli News : नऊ दिवस दुर्गादेवीची मनोभावे पूजा केल्यानंतर विसर्जन करण्यात येत आहे. विसर्जन मिरवणूक काढण्यात आली असता यात दुर्गादेवीचे गाणे लावण्यावरून वाद निर्माण होऊन दोन गट आमने सामने आले होते

संदीप नागरे

हिंगोली : नवरात्रोत्स उत्साहात साजरा करण्यात आल्यानंतर दुर्गादेवी विसर्जनाची तयारी सुरु झाली आहे. त्यानुसार हिंगोलीच्या वेलतुरा गावात दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत दोन गटात प्रचंड राडा झाला होता. यात काहींनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तर दगडफेक देखील करण्यात आली असून यात अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

हिंगोलीच्या वेलतुरा गावात काल रात्री दुर्गादेवीची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली होती. मिरवणूक सुरु असताना मिरवणुकीत दुर्गादेवी व्यतिरिक्त कोणतेही गाणे लावू नका; असे सांगितल्यावरून वाद निर्माण झाला होता. यातून काही तरुणांनी डीजे आणि बँड पथकातील व्यक्तींना मारहाण करत तोडफोड केल्याचा आरोप मिरवणुकीच्या आयोजकांनी केला आहे. तर गावात आमच्या नेत्यांचे पोस्टर फाडल्याने हा वाद सुरू झाल्याचं दुसऱ्या गटातील लोकांचे म्हणणे आहे.  

दोघांची प्रकृती गंभीर 

सदरच्या घटनेत आतापर्यंत २० ते २५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची पकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाद होण्यापूर्वी दोन्ही समाजातील नागरिकांनी एकमेकांना दुर्गादेवीच्या महाप्रसादामध्ये जेवण करण्यासाठी निमंत्रित केले होते. मात्र संध्याकाळी मिरवणूक सुरू होताच डिजेवर गाणे लावण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवला आणि प्रचंड दगडफेक झाली आहे.  

१२ जणांना घेतले ताब्यात 

सध्या वेलतुरा गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र पोलीस बंदोबस्तात दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी झालेल्या राड्यात संबंधितांची धरपकड सुरु केली आहे. आता पर्यंत दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील १२ ते १३ जणांना अटक करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena SC Case Live : भाजपाला वेगळा अन् ठाकरेंना वेगळा न्याय?, कपिल सिब्बल यांनी दाखवली आयोगाची दुटप्पी भूमिका

Maharashtra News Live Update: सरकारला पाय ठेवायला जागा राहणार नाही; जरांगेच पुन्हा सरकारला इशारा

Good News: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ऑनलाईन खरेदी करा खत, केंद्र सरकारने दिलं मोठं गिफ्ट

Testicular Cancer: अंडकोषात गाठ किंवा सूज दिसतेय? टेस्टिकुलर कॅन्सरपूर्वी शरीर देतं 4 संकेत

ST Bus Accident : महामार्गावर थरार! धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळले अन्..., २८ जण करत होते प्रवास

SCROLL FOR NEXT