Hingoli Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Water Crisis : दुष्काळाची दाहकता वाढली; हिंगोली जिल्ह्यात ५१ तलाव कोरडे ठाक

Hingoli News : मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा व हिंगोली या पाचही तालुक्यात असलेल्या ५१ लहान- मोठ्या तलावातील पाणीसाठा मे महिन्याच्या सुरुवातीलाच संपला

संदीप नागरे

हिंगोली : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. प्रामुख्याने पाण्याची समस्या भेडसावत असून हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे, कमी पावसामुळे तलावात साचलेले पाणी आटत चालले असून हिंगोली जिल्ह्यात असलेले ५१ लहान मोठे तलाव कोरडे ठाक पडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने (Hingoli) हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा व हिंगोली या पाचही तालुक्यात असलेल्या ५१ लहान- मोठ्या तलावातील पाणीसाठा मे महिन्याच्या सुरुवातीलाच संपला आहे, कडक उन्हाळ्यात देखील जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध असणारे हे तलाव यंदाच्या वर्षी मात्र कोरडे ठाक पडले आहेत. यामुळे शेत शिवारात (drought) आलेल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

पाण्यासाठी कोसोदूर भटकंती 

तलावातील पाणी आटले असून गावात देखील टँकरने येणारे पाणी कमी पडत आहे. यामुळे नागरिकांना देखील या पाणी टंचाईचा (Water Scarcity) मोठा फटका बसत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. भर उन्हात पाणी आणावे लागत असल्याचे चित्र सध्या हिंगोली जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT