Beed Bribe Trap : आरोपी न करण्यासाठी एक कोटींची लाच; एका इसमास अटक, पोलिस निरीक्षकासह हवालदार फरार

Beed News : तब्बल १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० लाख रुपये देण्याचे ठरले
Beed Bribe Trap
Beed Bribe TrapSaam tv

बीड : बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेटमध्ये झालेल्या घोटाळ्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून एक कोटी रुपयांची लाच मागण्यात आली. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षकासह हवालदार फरार झाले असून एका खासगी इसमास मात्र ताब्यात घेण्यात आले आहे. 

Beed Bribe Trap
Kalyan Crime : झटपट पैसे कमावण्याच्या नादात मूर्तीकार बनला चोर; लोकलमध्ये चोरी करताना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

बीड (Beed) जिल्ह्यात झालेल्या जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात मोठ्या व्यक्तींचे नाव असण्याची शक्यता आहे. याच प्रकरणात आरोपी न करण्यासाठी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व एका हवालदाराने तब्बल १ कोटी रुपयांच्या (Bribe) लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र याबाबत संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

Beed Bribe Trap
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील ९० टक्के होर्डिंग धोकादायक; मनपाने दिलेल्या नोटीसला एजन्सीचा ठेंगा

यानंतर एसीबीकडून सापळा लावण्यात आला असता पोलीस निरीक्षक खाडे यांनी व्यापारी कौशल जैन याच्याकडे ५ लाख रुपये देण्यास सांगितले. खाडे याच्या सांगण्यावरून जैन याने लाचेची रक्कम स्विकारताच त्याला अटक करण्यात आली. (Beed Police) पोलिस निरीक्षक खाडे व हवालदार जाधवर हे मात्र फरार आहेत. सदरची कारवाई बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे, भारत गारदे यांच्यासह सहकाऱ्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com