Hingoli Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Vidhan Sabha : निवडणूक खर्च दाखल करण्यास उशीर; निवडणूक विभागाची उमेदवारांना नोटीस

Hingoli News : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारांसाठी त्याची नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे

संदीप नागरे

हिंगोली : विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आता धडाडू लागल्या आहेत. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांना आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करावयाचा असतो. हा खर्च सादर करण्यास उशीर झाल्याने निवडणूक विभागाकडून उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारांसाठी त्याची नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. अर्थात निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारासाठी खर्च करण्याची मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. याशिवाय प्रचारादरम्यान खर्च कसा करण्यात आला आहे; याचा तपशील निवडणूक विभागाकडे सादर करावयाचा आहे. (Hingoli) हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी हा खर्च सादर करण्यास उशीर केला. 

हिंगोलीत विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी विहित वेळेत निवडणुकीचा खर्च दाखल केला नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हिंगोली विधानसभेतील तीन उमेदवारांना लेखी नोटीस बजावली आहे. यामध्ये अभिजीत खंदारे, आनंदकुमार धुळे, गोविंद वाव्हळ अशा तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान निवडणूक काळातील द्वितीय खर्च तपासणी पार पडली असून उमेदवारांनी तिसऱ्या खर्च तपासणीचा अचूक अहवाल निवडणूक विभागात वेळेत सादर करावा; अशा सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT