Chinese Manja Saam tv
महाराष्ट्र

Chinese Manja : हिंगोलीत दीड लाखांचा चायना बनावटीचा मांजा जप्त; विक्रेत्यावर गुन्हा दाखल

Hingoli News : राज्यभरात चायनीज मांजाने अनेकांचे बळी घेतले होते, या मांजामुळे पशुपक्षी व मानवाला गंभीर इजा होऊन जीव जात असल्याने गृह विभागाकडून कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या

संदीप नागरे

हिंगोली : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजा विक्री व वापरावर बंदी करण्यात आली आहे. असे असताना देखील सर्रासपणे (Chinese Manja) मांजा विक्री केला जातो. अशा चायना बनावटीच्या मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर (Hingoli) हिंगोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. (Live Marathi News)

मकर संक्रांत आली की पतंग उडविणे सुरु होत असते. परंतु हा पतंग उडविताना धोकेदायक चायना मांजा वापरला जात असतो. यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. राज्यभरात चायनीज मांजाने अनेकांचे बळी घेतले होते, या मांजामुळे पशुपक्षी व मानवाला गंभीर इजा होऊन जीव जात असल्याने गृह विभागाकडून (Hingoli Police) कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा मांजा वापर व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दीड लाखाचा मांजा जप्त 

त्यानंतर आता पोलीस ठिकठिकाणी पतंगाच्या दुकानावर चायनीज मांजा विक्री करताना कार्यवाही करत आहेत. अशाच प्रकारे हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने शहरातून दीड लाख रुपये किमतीचा चायनीज मांजा जप्त करत चायनीज मांजा विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी चायनीज मांजाची विक्री करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT