Sambhajinagar News : व्यापाऱ्याची दीड कोटींत फसवणूक; आरोपींना मुंबईतून अटक

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या दौलताबाद परिसरात १०२ एकर जमीन १४० कोटी ५६ लाख ५८ हजार रुपयांना विकत घेणार असल्याचे दाखविले
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : क्लब महिंद्राच्या नावाने १४० कोटींचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची दीड कोटी रुपयांची (Fraud) फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला छत्रपती संभाजीनगर (Sanbhajinagar) पोलिसांनी मुंबईतून अटक केली. (Latest Marathi News)

Sambhajinagar News
Petrol Tanker Drivers Strike News : महाराष्ट्रात इंधनाचा तुटवडा भासणार? पेट्रोल टॅंकर चालक उतरले संपात

क्लब महिंद्रा कंपनीची बनावट कागदपत्रे तयार करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या दौलताबाद परिसरात १०२ एकर जमीन १४० कोटी ५६ लाख ५८ हजार रुपयांना विकत घेणार असल्याचे दाखविले. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १ कोटी ४१ लाख २ हजार ६५८ रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस (police) ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य आरोपीला मुंबईतून (Mumbai) अटक केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar News
Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन दीड वर्षांपासून रखडले; कोट्यवधीचा खर्च करूनही आदिवासींचे हाल, पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

सहाजण ताब्यात 

या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोनिष विग, इशविन अरोरा, संदीप सपकाळ, ओंकार मुलुक, अनिल भांबिड उर्फ अनिल जाजू आणि इंद्रेश तिवारी अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व मुंबईत राहणारी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यावसायिक संदीप सुभाषचंद्र सोकीया यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com