Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन दीड वर्षांपासून रखडले; कोट्यवधीचा खर्च करूनही आदिवासींचे हाल, पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी; या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित असून या योजना यशस्वी होणार नाहीत, अशी स्थिती आहे.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर जलजीवन मिशन या कामांचा शुभारंभ केला. (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला दीड वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचे काम अजूनही अपूर्णच आहे. परिणामी आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

Jal Jeevan Mission
Chandrakant Patil News : माढ्याच्या उमेदवारीचा तिढा तिन्ही पक्षाचे नेते बसून सोडवतील; संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

नंदुरबारच्या नवापूर (Navapur) तालुक्यातील खोलविहिर, वांझळे गावात व आमसरपाडा गावात या गावांमध्ये दीड वर्षांपूर्वी ठेकेदारामार्फत जल जीवन अंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाण्यासाठी कामाला सुरुवात झाली होती. मात्र ठेकेदार उद्घाटन करून दीड वर्षापासून फरार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर हंडा डोक्यावर ठेवून पायपीट करावी लागत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jal Jeevan Mission
Dhule Corporation : मुख्यमंत्री धुळेकरांना देणार नवीन वर्षाची भेट; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी; या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित असून या योजना यशस्वी होणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे सरकारचा पैसाही वाया जाण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. तर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सर्वच कामांचा आढावा घेण्यात येऊन ज्या ठिकाणी कामांमध्ये अनियमीतता आणि भ्रष्टाचार आढळून येईल, त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com