Santosh Bangar Latest News: शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, संतोष बांगर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कावड यात्रेत तलवार फिरवल्याने त्यांच्यावर कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची परवानगी न घेता डीजे लावून गर्दी करत धिंगाणा घातला तसेच तलवारही नाचवली, असं पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (Latest Marathi News)
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत जाहीर सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली होती. गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
या टीकेला संतोष बांगर यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं होतं. उद्धव ठाकरे यांनी येड्यांची जत्रा उभी केली. येडे काहीही करू शकत नाहीत. थोडं त्यांच्यावर अंगावर धावून गेलं की, ते भुर्र पळून जाणारी लोक आहेत. याचा आमच्या शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही, अशी टीका संतोष बांगर यांनी केली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. या यात्रेला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी बांगर यांनी रस्त्यावर उतरून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. इतकंच नाही, तर एका शिवभक्ताने आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करत त्यांना तलवार दिली होती.
यावेळी बांगर यांनी म्यानातून ती बाहेर काढत हवेत भिरकावली. याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची परवानगी न घेता डीजे लावून गर्दी करत धिंगाणा घातला तसेच तलवारही नाचवली, असं पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.