Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : हिंगोलीत खळबळ.. भल्या पहाटे दोघांची रेल्वेसमोर उडी; एका शेतकऱ्याचा समावेश

HIngoli News : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महापुर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके वाहून गेल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आज भल्या पहाटे दोघांनी रेल्वेखाली उड्या घेत आपलं जीवन संपवले आहे. यामध्ये हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वसई गावातील एका शेतकऱ्याचा समावेश आहे. तर दुसरा व्यक्ती हा बोडखी गावातील संदीप प्रकाश हनवते असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही घटनांमुळे हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महापुर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके वाहून गेल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीसह पिके खरडून गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? या विवंचनेतून हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वसई गावातील अल्पभूधारक (Farmer) शेतकरी गंगाधर सातपुते (वय ३७) यांनी आज सकाळी वसई शिवारात मालगाडी पुढे उडी घेत आत्महत्या केली आहे.  

शेतात जाऊन गुरांसाठी चारही कापला 

गंगाधर सातपुते हे सकाळी कुटुंबाला शेतात गुरांसाठी चारा आणायला जातो म्हणून आले होते. शेतातील गुरांचा चारा देखील त्यांनी कापून घराकडे येण्याचं नियोजन केलं. मात्र अचानक पुराच्या पाण्याने शेतीचे झालेलं नुकसान त्यांना पाहवत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा पाऊल उचलण्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily wear Mangalsutra Design: डेली वेअरसाठी 'हे' नाजूक आणि एलिग्नंट मंगळसूत्र डिझाईन, नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषदाच्या दहा जागांसाठी आज मतदान

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे काय? जाणून घ्या याचं मूळ कारण अन् शरीरावर होणारा परिणाम

Weight Loss: दररोज सकाळी 'हे' काम केल्याने वजन होईल लवकर कमी, आठवडाभर करुन पाहा हे उपाय

Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT