Yeldari Dam Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : येलदरी धरणात केवळ ३० टक्के पाणीसाठा; हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

Hingoli News : राज्यात मराठवाडा, विदर्भ परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी हिंगोली जिल्ह्यात हवा तसा पाऊस अद्याप पर्यंत झालेला नाही

संदीप नागरे

हिंगोली : महाराष्ट्रासह मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यात अद्याप देखील समाधानकारक पाऊस बरसला नसल्याने अनेक लघु प्रकल्प व धरणे कोरडीच आहेत. पाऊस पडत नसल्याने येलदरी धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

राज्यात मराठवाडा, विदर्भ परिसरात जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी हिंगोली जिल्ह्यात हवा तसा पाऊस अद्याप पर्यंत झालेला नाही. यामुळे पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. परिणामी हिंगोलीच्या येलदरी धरणात (Yeldari Dam) मात्र केवळ ३० टक्केच पाणीसाठा जमा झाला आहे. पुढील काही दिवसात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसून हे धरण भरल तर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. अन्यथा गतवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. 

दमदार पावसाची प्रतीक्षा 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात चांगला पाऊस अद्याप झालेला नाही. यामुळे शेतात लागवड केलेल्या पिकांना देखील चांगल्या पावसाची गरज आहे. पिकांची वाढ होण्यासाठी खत देणे गरजेचे असून याकरिता शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात गोळीबाराचा थरार; महिलांसह तिघांवर गुन्हा

Eating Curd At Night: उन्हाळ्यात रात्री दही खावा की नाही?

Homemade Rice Cream For Face: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? घरच्या घरी बनवा तांदळाची सोपी क्रिम

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये पुन्हा कारला आग; पार्किंग माफियावर संशय

Sunday Horoscope: कामाचा ताण वाढेल, ५ राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवा; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT