Hingoli Saam TV
महाराष्ट्र

Hingoli : अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, हिंगोलीत भाजपमधील तिघांनी केलेल्या बंडखोरीकडे मराठवाड्याचे लक्ष

Hingoli Lok Sabha Constituency : स्वतःच्या पक्षाला आवाहन देत आपले उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केले आहेत. त्यामुळे आज हे बंडखोर उमेदवारी आपला अर्ज मागे घेणार की कायम ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

भरत नागणे

Lok Sabha Election :

देशभरात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यभरात नाराज झालेल्या अनेक बंडखोरांनी स्वतःच्या पक्षाला आवाहन देत आपले उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केले आहेत. त्यामुळे आज हे बंडखोर उमेदवारी आपला अर्ज मागे घेणार की कायम ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

मराठवाड्यातील हिंगोली लोकसभेत भाजपामधील तीन दिग्गज नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारा विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपचे लोकसभा संघटक रामदास पाटील, भाजपचे नेते योगी श्याम भारती महाराज व सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठविधीज्ञ भाजप नेते शिवाजी जाधव यांचा समावेश आहे.

भाजपामधील या बंडखोर नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह भाजपचे नेते व राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन काल दिवसभर हिंगोलीमध्ये तळ ठोकून होते कराड व महाजन यांच्या शिष्टाईनंतर हे बंडखोर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा घेऊन निर्णय कळवतो असं महाजन यांना म्हणाले होते. त्यानंतर मात्र आता हे बंडखोर अर्ज मागे घेणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

Krutika Deo: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची मालिकेत एन्ट्री, सुष्मिता सेनसोबतही केलंय काम

SCROLL FOR NEXT