राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीचे तिकीट देण्यात आले आहे. (Maharashtra Loksabha Election News)
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाकडून जोरदार विरोध केला जात होता. तसेच उमेदवारी बदलण्याची मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून करण्यात आली होती.
या मागणीनंतर आता हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्याच्याऐवजी शिंदे गटाचे बाबुराव पाटील कोहळीकर (Baburao Patil Kohlikar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.
यवतमाळमधून भावना गवळींचा पत्ता कट?
दरम्यान, यवतमाळमधून शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.