Hingoli News
Hingoli News Saam TV
महाराष्ट्र

Hingoli News: हिंगोलीत बळीराजाने स्वताच्या शरीरातील रक्त का काढलंय विक्रीला? धक्कादायक कारण उघडकीस

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

संदीप नागरे

Hingoli:

यंदा मराठवाड्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. या दुष्काळामुळे खरिपाच्या हंगामानंतर आता रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या पदरात निराशा टाकून जात आहे. आधी सोयाबीन, तूर आणि आता हरभरा हळद ही पीके पाण्याअभावी सुकून गेली आहेत. एकीकडे निसर्गाने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या फेऱ्यात टाकलं असताना दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आणि या मुळे वैतागलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क स्वतःच्या शरीरातील रक्तच विक्रील काढलं आहे.

काळीज पिळवटून टाकणारी हिंगोलीच्या बळीराजाची कहाणी

आमचं रक्त खरेदी करा, आणि बदल्यात दहा किलो गहू पाच किलो तांदूळ द्या. ही आर्त हाक दिली आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तपोवन गावच्या शेतकऱ्यांनी. या शेतकऱ्यांवर शरीरातील रक्त विक्रीला काढण्याची वेळ आलीये.

हिंगोलीच्या ईसापुर गावच्या शिवारात हळद पिकाची झालेली ही अवस्था पाहा, मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी केलेली लाखमोलाची ही हळद जुलै ऑगस्टमध्ये टवटवीत दिसत होती. मात्र आलनिनो वादळामुळे राज्यात पावसाचं प्रमाण कमी झालं आणि कायम नशीब आलेल्या कोरड्या दुष्काळाने पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेली हळद कोमेजून गेली.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन बळीराजा संकटात सापडला. अशा कठीण परिस्थितीत मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असताना राज्य सरकारच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही. उलट शेतकऱ्यांनी काढलेला पिक विमा देखील, पिक विमा कंपनी आणि केंद्र सरकारने नाकारल्याने शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीची दारे देखील बंद झाली.

केंद्र सरकारकडून एक रुपयामध्ये पिकविमा काढण्यात आला होता. आता या पीक विम्याची रक्कम हातामध्ये येईल या आशेवर शेतकरी असताना, पीक विमा कंपनीने मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास असमर्थता दाखवली. केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने हिंगोली जिल्ह्याला पीक विमाच्या रकमेतून वगळण्यात आल्याचा अहवाल दिला. याचा फटका हिंगोली जिल्ह्यातील पाच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बसला, ज्यामध्ये शेतकऱ्यांचे दीडशे कोटी रुपये बुडाले आहेत.

दुष्काळाचे दुष्टचक्र आणि प्रशासन व लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या शरीरातील रक्त विक्रीला काढले आहेत. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तपोवन गावातील शेतकऱ्यांनी मनात धडकी भरवणारा हा कठोर निर्णय घेतला आहे.

सत्येच्या सारीपाटावर बसलेले राज्यकर्ते हिंगोलीच्या या बळीराजाची अवस्था पाहून मदत जाहीर करणार का? आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या फिर्यातून बाहेर कधी काढणार हेच पहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT