Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : हिंगोलीत खळबळ..बदनामी का करतेस म्हणत घरात घुसून तरुणीवर हल्ला; नात्यातील तरुणाकडूनच हत्या

Hingoli News : पोलिसांच्या तपासात खून झालेली तरुणी हि स्वतःच्या घरात दुसऱ्या मजल्यावर होत. यावेळी आरोपीने अचानक पाठीमागून येत तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याचे पुढे आले आहे

संदीप नागरे

हिंगोली : घरात असलेल्या तरुणीवर नात्यातीलच तरुणाने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना हिंगोलीत घडली आहे. किरकोळ वादामधून १९ वर्षीय तरुणीचा खून झाल्याचे समोर आले असून या घटनेने हिंगोलीत खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवत मारेकरीला ताब्यात घेतले आहे. 

हिंगोलीच्या गोरेगाव भागात सदरची घटना घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. यात संजना गजानन खिल्लारी असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांच्या तपासात खून झालेली तरुणी हि स्वतःच्या घरात दुसऱ्या मजल्यावर होत. यावेळी आरोपीने अचानक पाठीमागून येत तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याचे पुढे आले आहे. तरुणीवर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. 

मारेकरी तरुणीचा नातेवाईक 

पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना संशयिताला ताब्यात घेतले आहे. यात त्याची चौकशी केली असता खून झालेल्या तरुणीचा नातेवाईक तरुण आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. खुनाच्या या घटनेनंतर हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत या संपूर्ण खुनाच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. 

संशयित आरोपीला अटक 

या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत तपासाला सुरवात केली. दरम्यान गोरेगाव पोलिसांनी खून करून पसार झालेला संशयित आरोपी अभिषेक खील्लारी याला अटक केली आहे. मात्र तरुणीवर इतक्या क्रूर पद्धतीने आरोपीने हल्ला कोणत्या कारणातून केला याचं कारण अद्याप समोर आलेले नसून हिंगोली पोलीस याचा शोध घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT