Hingoli news  saam tv
महाराष्ट्र

हिंगोलीत चाललंय काय? तरुणांकडून एसटी बस अडवून महाविद्यालयीन तरुणींची छेड, संतप्त नातेवाईकांची पोलिसात धाव

हिंगोलीत एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संदीप नागरे

Hingoli News : हिंगोलीत एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींची छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयीन तरुणींची छेड काढल्याच्या प्रकारानंतर हिंगोलीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे हिंगोलीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनात धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत (Hingoli) एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोलीतील औंढा राष्ट्रीय महामार्गावरील दिग्रस पाटील येथे महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींची बस अडवून तरुणांनी ही छेड काढल्याची माहिती तरुणींनी पोलिसांत दिली आहे.

या प्रकारानंतर संतप्त झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानकात हजर होत आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेने संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात देखील खळबळ उडाली आहे. शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली आहे. नागरिकांकडून आरोपींच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत. हिंगोली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानक परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर स्वतः पोलीस तालुक्यात दाखल झाले असून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Maharashtra Politics: ठाण्यापाठोपाठ कोकणातही महायुतीत वाद? वर्चस्वाचं राजकारण, भगव्या शालीचं कारण?

Maharashtra Rain: राज्यात पुढचे ४ दिवस कोसळधार, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट? वाचा हवामान खात्याचा अंदाज

OTT Releases: 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ते 'द ट्रायल २'; या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार हे धमाकेदार चित्रपट आणि सीरिज

Dhananjay Munde: राजकीय कमबॅक की समाजाला न्याय? बंजारा आरक्षणावर धनंजय मुंडेंचं राजकारण?

SCROLL FOR NEXT