हिंगोलीमध्ये २ दुचाकींची समोरासमोर धडक
अपघातात दोन व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू
उमरा ते बोल्डा रस्त्यावर घडली अपघाताची घटना
हिंगोलीमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये दोन व्यापाऱ्यांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये हिंगोलीतील दोन प्रसिद्ध व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यातील उमरा ते बोल्डा रस्त्यावर ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. २ व्यापाऱ्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण समोर आले नाही. हिंगोली पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यातील उमरा ते बोल्डा या मार्गावरील जांभरून फाटा येथे हा अपघात झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोन्ही व्यापाऱ्यांनी जागीच प्राण सोडले. माजीद शेख आणि सुधाकर साखरे अशी मृत्यू झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. कळमनुरी पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक शेख माजीद बागवान हे आपल्या शेतातून घराकडे येत होते. तर किरकोळ व्यवसाय करणारे कळमनुरी तालुक्यातील वाकोडी गावचे व्यापारी सुधाकर साखरे हे दुचाकीवरून जात होते. दोन्ही व्यापाऱ्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दोघेही वेगाने दुचाकी चालवत होते. दोन्ही दुचाकींची धडक झाल्यानंतर दोन्ही व्यापारी रस्त्यावर पडले.
अपघातामध्ये दोन्ही व्यापाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे दोन्ही व्यापाऱ्यांनी जागीच जीव सोडला. या अपघाताची नोंद कळमनुरी पोलिसांनी केली असून ते पुढील तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती. रुग्णालयात दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.