Hindustani bhau and Madhuri elephant Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Madhuri hatti : हिंदुस्तानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, VIDEO

Hindustani bhau on Kolhapur Madhuri hatti : हिंदुस्तानी भाऊने कोल्हापुरातील आंदोलकांना शिवीगाळ केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. हिंदूस्तानी भाऊच्या विरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Vishal Gangurde

कोल्हापुरातील माधुरी हत्तीणीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. वनतारामध्ये नेलेल्या माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. या वादात आता हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकने उडी घेतली. हिंदुस्तानी भाऊने माधुरी हत्तीणीवरील आंदोलनावरून कोल्हापूरकरांतील आंदोलकांना शिवीगाळ केली आहे. हिंदुस्तानी भाऊच्या शिवीगाळीनंतर ठाकरे गटाने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदुस्तानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार असल्याचा इशाराच ठाकरे गटाने दिला आहे.

माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एकवटले आहेत. हत्तीणीसाठी कोल्हापूरकरांतील आंदोलकांनी थेट उद्योजक अनंत अंबानी यांनी लक्ष्य केलं. जिओ सीमकार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. अंबानींच्या वनतारामध्ये नेण्यात आलेल्या माधुरी हत्तीणीसाठी हजारोंच्या संख्येने पदयात्रा देखील काढण्यात आली. आता याच वादात हिंदुस्तानी भाऊने उडी मारून थेट कोल्हापूरकरातील आंदोलकांना शिवीगाळ केली.

हिंदूस्तानी भाऊच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे प्रशांत भिसे म्हणाले, 'हिंदुस्तानी भाऊला एकच गोष्ट गोष्ट सांगतो. कोल्हापूरकरांना शिवीगाळ करण्याच्या भानगडीत पडू नको. कोल्हापूरचं प्रॉडक्ट म्हणजे कोल्हापुरी चप्पल तुला माहीत आहे. त्या चप्पलेने तुझं तोंड फोडणार म्हणजे फोडणार. मराठी माणसाच्या नादी लागू नको हे लक्षात ठेव'.

हिंदूस्तानी भाऊ काय म्हणाला होता?

'अनंत अंबानींना कशाला बोलत आहात? तुम्ही अन्न खाता की x#%@?, अशा भाषेत हिंदूस्तानी भाऊने कोल्हापूरकरांना शिवीगाळ केली.

हिंदूस्तानी भाऊ नरमला

हिंदूस्तानी भाऊ आज स्पष्टीकरण देताना म्हटलं की, 'खूप लोकांना वाटतंय की, हिंदूस्तानी भाऊने कोल्हापूरकरांवर बोललो, पण तसं नाही. मी माझ्या आई आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो की, मी राजकारणी लोकांविषयी बोलत होतो. या आंदोलनातील राजकारणी लोकांचा खरा चेहरा समोर येईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT